‘हे’ आहेत दिल्लीचे 5 सर्वात श्रीमंत उद्योगपती

5 richest industrialist of Delhi : भारताची राजधानी दिल्लीत अनेक मोठे उद्योगपती राहतात. दिल्लीचे सर्वात मोठे उद्योगपती आणि दिल्लीतील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये पहिले नाव घेतले जाते ते म्हणजे एचसीएल टेकचे मालक शिव नाडर. शिव नाडर हे खूप मोठे उद्योगपती आहेत. जाणून घेऊया दिल्लीतील 5 मोठ्या उद्योगपतींबद्दल.
शिव नाडर (Shiv Nadar)
शिव नाडर हे दिल्लीतील सर्वात मोठे उद्योगपती आहेत. यासोबतच ते दिल्लीचे सर्वात श्रीमंत व्यक्ती देखील आहेत. 1976 मध्ये शिव नाडर यांनी एचसीएल टेकची सुरुवात केली. आज ही कंपनी केवळ भारतातच नाही तर परदेशातही व्यवसाय करते. शिव नाडर यांची निव्वळ संपत्ती 3550 कोटी डाॅलर म्हणजेच जवळपास 2.94 लाख कोटी रुपये आहे. (Shiv Nadar Net worth)
सुनील भारती मित्तल (Sunil Bharti Mittal)
सुनील भारती मित्तल हे भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. त्यांच्या कंपनीचा व्यवसाय अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे. देशातील लोकप्रिय टेलिकॉम कंपनी एअरटेलचाही यात समावेश आहे. पंजाबमध्ये जन्मलेले सुनील मित्तल आज भारतातील एक मोठे उद्योगपती आहेत. सनील मित्तल यांची निव्वळ संपत्ती 1190 कोटी डाॅलर म्हणजेच 98,770 कोटी रुपये आहे.
रवी जयपुरिया (Ravi Jaipuria)
रवी जयपुरिया हे देखील मोठे उद्योगपती आहेत. रवी जयपुरिया हे वरुण बेव्हरेजेसचे संस्थापक आहेत. रवी जयपुरिया यांनी कंपनीला पेप्सिकोसाठी सर्वात मोठ्या फ्रँचायझी बॉटलर्सपैकी एक बनवले आहे. याशिवाय, रवी जयपुरिया देवयानी इंटरनॅशनलचे अध्यक्ष म्हणून काम करतात, जे कोस्टा कॉफी, केएफसी आणि पिझ्झा हट सारखे प्रसिद्ध फास्ट-फूड रेस्टॉरंट चालवतात. रवीजयपुरिया यांची निव्वळ संपत्ती जवळपास 13.2 अब्ज यूएस डॉलर्स म्हणजेच 1.095 लाख कोटी रुपये आहे.
राजीव सिंग (Rajiv Singh)
राजीव सिंग हे दिल्लीतील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या डीएलएफ लिमिटेडचे ते अध्यक्ष आहेत. सिंग यांची निव्वळ संपत्ती अंदाजे 1,24,420 कोटी रुपये आहे.
विक्रम लाल (Vikram Lal)
दिल्लीतील प्रसिद्ध उद्योगपतींमध्ये विक्रम लाल यांचेही नाव आहे. ते आयशर मोटर्सचे मालक आहेत. आयशर मोटर्स रॉयल एनफिल्ड या दिग्गज बाइकसाठी प्रसिद्ध आहे. लाल यांची संपत्ती अंदाजे 820 कोटी डाॅलर म्हणजेच 68,060 कोटी रुपये आहे.

