न्यूयॉर्कच्या उपनगरामध्ये 5 जणांना भोसकले
Updated On:

न्यूयॉर्क : न्यूयॉर्कच्या रॉकलॅन्ड भागामध्ये ज्यू समाजाच्या हनुक्काह महोत्सवामध्ये एका व्यक्तीने 5 जणांना भोसकले आहे. या चाकू हल्ल्यासंदर्भात एका व्यक्तीला संशयावरून अटक करण्यात आली आहे.
शनिवारी हॅसिडीक रब्बी येथील प्रार्थनाघरामधील या महोत्सवात किमान 100 नागरिक उपस्थित होते. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हल्लेखोर तेथे घुसला आणि त्याने उपस्थितांना भोसकण्यास सुरुवात केली.
थोड्या अवधीमध्ये त्याने दुचाकीवरून पळ काढला, असे ज्यू पब्लिक अफेअर्स कौन्सिलने म्हटले आहे. या चाकू हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू आणि अध्यक्ष रेउवेन रिवलीन यांनी या चाकू हल्ल्याचा जोरदार निषेध केला आहे.





