मोठी बातमी : धावत्या ट्रेन मधून प्रवासी खाली पडले; ६ जणांचा मृत्यू, दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान दुर्घटना

Local Train | मध्य रेल्वेच्या दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. एक लोकल कसाऱ्याच्या दिशेनं येत होती. तर, दुसरी लोकल सीएसएमटीच्या दिशेनं जात होती. दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान, या दोन्ही धावत्या लोकल एकमेकांच्या जवळून गेल्याने फुटबोर्डवर उभे असलेल्या प्रवाशांचा तोल जाऊन काही प्रवासी खाली पडले.
सेंट्रल रेल्वे दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर सीएसएमटीकडे जाणारे काही प्रवासी लोकलमधून पडले. लोकलमध्ये जास्त गर्दी असल्यामुळे हा अपघात असल्याची माहिती आहे. रेल्वे आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्वीट करत लिहिले की, “दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे.”
दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 9, 2025
नेमकं काय घडलं?
आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाण्यासाठी मुंबईकर लोकलने निघाले होते आणि गर्दीही प्रचंड होती. मात्र सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा-दिवा या स्थानकादरम्यान दोन लोकल एकमेकांना घासले. ज्यानंतर लोकलमधून ८ प्रवासी ट्रॅकवर पडले. यातील ६ जणांचा मृत्यू झाला असून काहींना गंभीर दुखापत झाली आहे. सध्या रेल्वे विभागाकडून या घटनेची माहिती घेतली जात आहे.
हेही वाचा:





