Pune District : आठ एकर मक्यातून पाच लाखांचा नफा

नायगाव : पुरंदर तालुक्यातील नायगाव गावामधील शेतकरी दिलीप मोरे या शेतकर्यांनी आपल्या शेतात पायोनियर पी 3524 या मका पिकाच्या वाणाचे 8 एकर मध्ये दर्जेदार उत्पन्न घेतले आहे. त्यांना अंदाजे 1 लाख 20 हजार रुपये खर्च आला. खर्च वजा जाऊन 5 लाख रुपयांचे त्यांना अवघ्या तीन महिन्यांत उत्पन्न मिळाले.
मका पिकाचे भरघोस उत्पादन शेतकर्यांसाठी घेतलेल्या शेतकरी दिलीप मोरे यांच्या या उत्कृष्ट गुणवत्ताधारक पिकाची माहिती शेतकर्यांनाही व्हावी म्हणून नायगाव येथील त्यांच्या प्लॉटवरच यांच्या प्लॉटवर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मोरे यांनी मका पिकाची लागवड आठ एकर एवढ्या क्षेत्रामध्ये केली होती. ही मका पेरणी यंत्राच्या साह्याने संपूर्ण आठ एकर पेरली होती यामध्ये दोन ओळीतील अंतर हे दोन फूट असून दोन झाडातला अंतर हे नऊ इंच ठेवण्यात आले होते. खत व्यवस्थापनामध्ये सुरुवातीला म्हणजेच पेरणीच्या वेळेस प्रति एकर दोन 102626 या गोण्या प्लस दहा किलो झिंक सल्फेट अशाप्रमाणे पेरणीचा बेसल डोस हा घेतला होता. त्याचप्रमाणे बाराव्या दिवसा नंतर किडीवरचे नियंत्रण करण्यात आले यानंतर 21 दिवसांच्या नंतर तण नियंत्रण करण्यात आले.
या वेळेस उपस्थित शेतकर्यांना पिकाची माहीती तसेच लाइव्ह डेमोची व्यवस्था करण्यात आली होती. ज्यामध्ये मका उत्पादन वाढ, मुरघास तंत्रज्ञान माहिती, चारा व्यवस्थापन या बद्दल जागरूकता करण्यात आली. या कार्यक्रमात पायोनियर कंपनीचे टेरिटरी मॅनेजर जोतीराम गोडसे यांनी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी नायगाव रिटेलर संदीप खेसे, संतोष यादव, संतोष चौंडकर, अजिंक्य कड, दीपक यादव, धनंजय चौंडकर आदींनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पायोनियर कंपनीचे प्रतिनिधी स्वप्नील बनकर,ओंकार लोणकर, विशाल सूर्यवंशी यांनी मोठी मेहनत घेतली होती.
यावेळी बाळासाहेब यादव, हरिचंद्र चव्हाण, चंद्रकांत चौंडकर, मोहन बनकर, गोविंद खेसे, सचिन खळदकर, ऋषिकेश मोरे, जालिंदर हेंद्रे, मोहन खळदकर, कोमल बोरावके आदी उपस्थित होते.





