अहमदाबाद : मिनी व्हॅनची अज्ञात वाहनाला धडक; अपघातात पाच ठार,10 जखमी
Updated On:

गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील ढोलका शहराजवळ एका मिनी व्हॅनने अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. मिनी व्हॅनमधील लोक वडोदरा येथून बोताड जिल्ह्यातील एका मंदिरात दर्शनासाठी जात होते.
ढोलका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. भरधाव वेगात असलेल्या मिनी व्हॅनने पुढे जाणाऱ्या वाहनाला धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. मृतांमध्ये व्हॅन चालकाचाही समावेश आहे.





