Dasara Melava | दसऱ्याच्या दिवशी अनेक राजकीय पक्षाचे दसरा मेळावे होत असतात. शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा, शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा हे दोन दसरा मेळावे मुंबईत असणार आहे. तर आरएसएसचा दसरा मेळावा नागपूरमध्ये होणार आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवानगडावर आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा नारायणगडावर होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर या दसरा मेळाव्यांना खूपच महत्व असणार आहे. एकीकडे ठाकरे बंधुच्या युतीची चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दसरा मेळाव्यानिमित्ताने एकाच मंचावर येणार असल्याचे देखील म्हंटले जात आहे. Dasara Melava | शिवसेना ठाकरे गट दसरा मेळावा शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा आज दादर येथील शिवतीर्थ येथे सायंकाळी ५ वाजता होईल. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे नेमकी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २०२२ साली शिवसेनेतून शिंदे गट फुटल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांचा स्वतंत्र दसरा मेळावा आयोजित होत आहेत. शिवसेना शिंदे गट दसरा मेळावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील गोरेगावमधील नेस्को एग्झिबिशन सेंटरमध्ये होणार आहे. हा मेळावा सायंकाळी ६ वाजता सुरू होईल. यंदाचा दसरा शेतकऱ्यांच्या बांधावर, स्थळ बदललंय परंपरा नाही… अशी पोस्ट एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या ठिकाणाबद्दल माहिती देताना केली आहे. आरएसएसचा दसरा मेळावा दसऱ्याच्या दिवशी आरएसएसकडून शस्त्रपूजन केले जाते. त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण होते. या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर आज दसऱ्याच्या दिवशी आरएसएसकडून आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाला खूपच जास्त महत्त्व असणार आहे. Dasara Melava | पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी सुरू केलेला भगवानगडावरील दसरा मेळावा सध्या बीडच्या सावरगाव घाट राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मभूमीत होत आहे. या मेळाव्याचे नेतृत्व भाजपा नेत्या पंकजा मुंडे करत आहेत. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजताच्या सुमारास सुरू होईल. मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा बीडमधील नारायणगडावर होणार आहे. हेही वाचा: ४९ महाविद्यालये अस्तित्वातच नाहीत! विद्यापीठ अधिसभेत खळबळजनक माहिती उघड..जाणून घ्या सविस्तर माहिती