पुणे जिल्हा | खेड-आळंदीत 17 जणांकडून 44 नामनिर्देशन अर्ज दाखल
राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास मंगळवार (दि. 22) पासुन करण्यास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
मंगळवारी 17 जणांनी 44 नामनिर्देशन पत्राची खरेदी केली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अनिल दौंडे यांनी दिली.
सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून महायुतीचे उमेदवार त्त्हा विद्यमान आमदार दिलीप मोहिते हे निश्चित मानले जात आहेत.
तर महाविकास आघाडीत इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे नवरात्रीपासुन मोठ्या घडामोडी घडु लागल्याने सोशल मीडियावर सोशल वॉर चागंलेच रंगले आहे. नामनिर्देशन पत्र दाखल होत असताना.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात तिकीट शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाला की राष्ट्रवादी शरद पवार गटाला होणार याकडे मतदारसंघातील मतदार आणि इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
शिंदे शिवसेनेत दाखल झालेल्या माजी आमदार स्व. सुरेश गोरे यांच्या पत्नी मनिषा गोरे यांनी अनपेक्षितपणे राष्ट्रवादी शरद पवार गटात जाहिर प्रवेश होणार असल्याने राजकिय डावात इच्छुक उमेदवारांचा चागंलाच हिरमोड झाला असल्याची स्थिती निर्माण झाली आहे इच्छुक उमेदवारांचे कार्यकर्त्यामध्ये अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे.





