रोम – इटलीमध्ये एक केबल कार कोसळून झालेल्या अपघातात ४ जण ठार झाले आहेत. इटलीच्या दक्षिणेकडील नेपल्स प्रांतात ही दुर्घटना घडली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मृतांमध्ये ३ पर्ययटकांचा समावेश आहे. यात एक ब्रिटीश महिला आणि इस्रायली महिला आहेत. चौथा मृत व्यक्ती हा इटलीचा नागरिक असून तो केबल कारचा चालक होता, असे महापौरांच्या प्रवक्त्याने सांगितले. जखमी झालेल्या पाचवा व्यक्ती हा परदेशी पर्यटक असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला नेपल्स येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कॅस्टेलमारे डी स्टॅबिया शहरातील मोंटे फेटो येथील ट्रॅक्शन केबल तुटली आणि एक कार कोसळली. यामुळे येथून वरच्या दिशेने जाणारी आणि खालच्या दिशेने जाणारी केबल कार जागेवरच थांबल्या. या थांबलेल्या कारमधील १६ पर्यटकांना सुखरुपपणे सोडवण्यात आले. माउंट व्हेसुव्हियस आणि नेपल्सच्या उपसागराच्या दृश्यांसाठी प्रसिद्ध असलेली केबल कार पर्यटनाच्या हंगामासाठी पुन्हा सुरू करण्यात आल्यानंतर अवघ्या एका आठवड्याने हा अपघात झाला.