4 बायपास सर्जरी अन्…..; मृत्यूच्या दारातून परतला हा कॅामेडी किंग! आता जगतोय असं जीवन..

Sunil Grover | सिनेमा इंडस्ट्रीत येण्यासाठी अनेकजण धडपडत असतात. एखाद्या स्टारच्या सिनेमात एक छोटासा रोल मिळावी, अशी आशा घेऊन ते मायानगरी अर्थात मुंबईत दाखल होतात. पण सगळ्यांनाचा काम मिळतात असं नाही, अनेकांना त्यासाठी मोठी कसरत करावी लागते. एवढ करुनही स्ट्रगल येणे हे तर स्वभाविकच बनलं आहे. त्या स्ट्रगलला घेऊन अनेक कलाकार काम करतात. आजच्या घडीचा विचार करता स्ट्रगल करुन अनेक कलाकारांच्या नावानेच सिनेमे चालतात. असा प्रेक्षकवर्ग अशा कलाकारांनी मिळवलाय. अशा कलाकारांची लिस्टदेखील खूप मोठी आहे. या लिस्टमध्ये द किपल शर्मा शोमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा आणि पुढे अनेक सिनेमा वेबसिरीजमध्ये काम केलेला अभिनेता म्हणजे सुनील गो ग्रोव्हर.
इंडस्ट्रीत काम करताना त्याच्या वाट्याला अनेक चढ उतार आले. पण त्याने परिस्थिशी दोन हात करत चालत राहिला. त्याच्या पडत्या काळात त्याच्या पत्नीने त्याला मोलाची साथ दिली. आता या स्टारला बॉलीवूडमध्ये आपलं अढळ स्थान निर्माण केले आहे. या अभिनेत्याला आज कॉमेडीचा मास्टर म्हटले जाते. हरियाणातील एका लहानशा गावात जन्मलेल्या सुनीलला लहानपणापासूनच आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्यानी पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथून थिएटरमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले.
स्टारडम मिळवण्याचे स्वप्न घेऊन तो मुंबईत आला, जिथे त्याच्या यशाचा मार्ग आव्हानांनी भरलेला होता. अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्याने केवळ घराघरात नावच निर्माण केले नाही तर आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर संपूर्ण इंडस्ट्रीत त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली. कारकिर्दीच्या सुरुवातीस ते फक्त 500 रुपये कमवू शकत होता. आर्थिक संकट असतानाही तो मुंबईत स्थिरावला. जिद्दी आणि चिकाटीच्या जोरावर त्याने प्रचंड मेहनत केली. अनेर चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम करूनही त्याला खरी ओळख मिळत नव्हती. अखेर ‘द कपिल शर्मा शो’मधील गुत्थीच्या व्यक्तिरेखेने त्याने ओळख मिळाली.
अन् ४ शस्त्रक्रिया झाल्या.
खरंतर, 2022 मध्ये सुनील ग्रोव्हरच्या आयुष्यात एक मोठं वळण आलं होतं. त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान त्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये ९० टक्के ब्लॅाक झाल्याचे डॅाक्टरांनी सांगितले होते. अशा परिस्थितीत त्याच्याकडे शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय नव्हता. सुनीलवर तब्बल ४ बायपास शस्त्रक्रिया झाल्या. दीर्घ उपचारानंतर तो बरा झाला आणि त्याने पडद्यावर जोरदार पुनरागमन केले.





