China : चीनमधील आगीत 38 जणांचा होरपळून मृत्यू; आग विझवण्यासाठी…

बीजिंग – चीनमधील हेनान प्रांतात एका वस्त्रोद्योग उत्पादक कंपनीमध्ये लागलेल्या आगीत किमान 38 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. वेनफेंग जिल्ह्यातील अनयांग शहरातल्या या कपड्याच्या कारखान्याला सोमवारी ही आग लागली होती. अग्निशामक दलाला ही आग विझवण्यासाठी 4 तासांपेक्षा अधिक वेळ झगडावे लागले होते.
या आगीमध्ये दोघेजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कंपनीमध्ये प्रतिबंधात्मक उपाय योजना आणि नियमांचे पालन करण्यात आले नव्हते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्राथमिक तपासामध्ये व्ल्डिंगच्यावेळी उडालेल्या ठिणग्या कापडावर पडल्यामुळे ही आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. या आगीला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि जखमींवर योग्य उपचार करण्यात यावेत, अशा सूचना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिल्या आहेत.
Maharashtra : पोषक वातावरणामुळे राज्यात उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीत वाढ – उपमुख्यमंत्री फडणवीस
2015 च्या ऑगस्ट महिन्यात तियान्जीन पोर्ट येथे विषारी रसायनांच्या एका गोदामात झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या आगीत 170 जण ठार झाले होते. तर 700 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते.







