३६ वर्षीय युवकाची विहिरीत उडी घेत आत्महत्या
Updated On:

बुलडाणा – सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील एका ३६ वर्षीय युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या युवकाने आत्महत्या नेमकं कोणत्या कारणाने केली हे अद्याप कळू शकले नाही.
गोविंद संपत नागरे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. साखरखेर्डा पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी धाव घेत या घटनेची नोंद करून घेतली आहे.
आत्महत्याग्रस्त नागरे यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. त्याची पत्नी मुलांसह माहेरी राहत असल्याचे समजते. पोलीस पाटील पांडुरंग सोनुने यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला असून ठाणेदार जितेंद्र अडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार नारायण गीते, पोलीस कॉन्स्टेबल विशाल बनकर पुढीत तपास करत आहेत.





