दिल्लीत 352 मद्यपी चालकांवर कारवाई
Updated On:

नवी दिल्ली : दिल्ली शहरात 31 डिसेंबरच्या रात्री दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या 352 वाहन चालकांच्या विरोधात पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. काल रात्री शहरात पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करून चोख बंदोबस्त ठेवला होता.
मॉल्स, पंचतारांकित हॉटेल्स, पब, बार अशा सार्वजनिक ठिकाणी पोलिसांनी जादा बंदोबस्त व वाहनचालकांची तपासणी सुरू ठेवली होती. त्यात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला होता.
त्यामुळे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांचे प्रमाण इतरवेळेपेक्षा कमी आढळले. तथापि तरीही 352 जण त्या तपासणीत दोषी आढळले. त्या सर्वांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. नवीन वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषाचे वातावरण राजधानी दिल्लीत पोलिसांनी घेतलेल्या विशेष दक्षतेमुळे यंदा बऱ्यापैकी शांत व नियंत्रणात राहिले होते.





