Kolhapur Court Strike : कोल्हापूरसह राज्यभरात ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर
Kolhapur Court Strike : महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ गट क व गट ड, महाराष्ट्र राज्य बेलीफ महासंघ व महाराष्ट्र राज्य स्टेनोग्राफर असोसिएशन यांच्या वतीने उच्च न्यायालयाप्रमाणे दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी आजपासून संपूर्ण राज्यभर बेमुदत संपास सुरुवात झाली.

Kolhapur Court Strike : महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ गट क व गट ड, महाराष्ट्र राज्य बेलीफ महासंघ व महाराष्ट्र राज्य स्टेनोग्राफर असोसिएशन यांच्या वतीने उच्च न्यायालयाप्रमाणे दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी आजपासून संपूर्ण राज्यभर बेमुदत संपास सुरुवात झाली. (Kolhapur Court Strike)
कोल्हापूर जिल्ह्यातील 900 न्यायालयीन कर्मचाऱ्यांसह संपूर्ण राज्यभरातील 34000 न्यायालयीन कर्मचारी या बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटना, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा तसेच कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन यांनी या अगोदरच या संपाला पाठिंबा जाहीर केला आहे. (Kolhapur Court Strike)
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कसबा बावडा येथील जिल्हा व सत्र न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालय येथे आंदोलन सुरू आहे. आज सकाळपासून कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर घातलेल्या मंडपात सर्व न्यायालयीन कर्मचारी एकत्र जमले. (Kolhapur Court Strike)
यामध्ये कोल्हापूर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना वर्ग 3, कोल्हापूर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी वर्ग चार संघटना, जिल्हा स्टेनोग्राफर असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा बेलीफ संघटन या चारही संघटनांचे पदाधिकारी व न्यायालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Kolhapur Court Strike)
यावेळी कर्मचारी संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली मनोगतं व्यक्त केली व आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचं आवाहन केलं. (Kolhapur Court Strike)
महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ गट क चे अध्यक्ष श्री दिगंबर निकम यांनी आजपासून सुधारित वेतनश्रेणीच्या मागणीसाठी नाशिक येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. (Kolhapur Court Strike)
तसेच संपूर्ण राज्यभरात सर्व जिल्हा व तालुका न्यायालयातील कर्मचारी हे त्यांच्या न्यायालयाच्या ठिकाणी व सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचारी हे त्या त्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. (Kolhapur Court Strike)
कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचारी यांच्या वतीने सुधारित वेतन श्रेणीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. (Kolhapur Court Strike)
उच्च न्यायालयाप्रमाणे दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी तात्काळ लागू करण्यात यावी, यासाठी हे आंदोलन सुरू आहे. सुधारित वेतनश्रेणी लागू व्हावी याबाबतचा प्रस्ताव गेले पावणे दोन वर्ष मंत्रालयात प्रलंबित असल्यामुळे न्यायालयीन कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व असंतोष आहे. त्याचप्रमाणे शेट्टी आयोग, मानवधणे आयोग, दाभोळकर आयोग यांच्या शिफारशींची पूर्णपणे अंमलबजावणी अद्यापही करण्यात आलेली नाही. (Kolhapur Court Strike)
न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सुधारत वेतनश्रेणीच्या मागणीसाठी सुरू केलेल्या बेमुदत संपाला कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक, माजी अध्यक्ष सर्जेराव खोत, शिवाजीराव राणे अजित मोहिते, रणजीत गावडे, गिरीश खडके, पिराजी भावके, अभिजीत कापसे, प्रशांत पाटील, बाबा नेरले, बी आर पाटील, रवींद्र जानकर, कॉमन मॅन संघटनेचे बाबा इंदुलकर, तसेच वकील यांनी आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला. (Kolhapur Court Strike)
या आंदोलनामुळे हजारो न्यायालयीन तारका असणाऱ्या नागरिकांचे आज हाल झाले. न्यायालय परिसरात उपस्थित राहून पुढील तारीख न मिळालेल्या नागरिकाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. (Kolhapur Court Strike)
यावेळी कोल्हापूर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना गट क चे अध्यक्ष महेश पाटील, कोल्हापूर जिल्हा बेलीफ संघटनेचे अध्यक्ष अन्वर पठाण, कोल्हापूर जिल्हा स्टेनोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष शीला काशीद, कोल्हापूर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना गट ड चे अध्यक्ष बाबासाहेब तांबे, शिवाजीराव वाडकर, फिरोज ताशिलदार, राजेश पाटील, प्रमोद सावंत, संतोष जाधव, संदीप सनगर, सतिश देसाई, अनिल जाधव, रणजीत साळोखे, राजीव माने नेहा सावंत, सविता राजकर, अपर्णा कागले यांच्यासह सर्व संघटनांचे पदाधिकारी व स्टेनोग्राफर, लिपिक, बेलिफ, शिपाई मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Kolhapur Court Strike)





