China landslide : चीनमध्ये दरड कोसळल्याने ३४ जण अजूनही बेपत्ता तर, ८ जण ठार !
चीनच्या नैऋत्येकडील चोंगोइंग शहरात दरड कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या ३४ जणांचा सोध घेण्याचे काम अजूनही अव्याहतपणे सुरू आहे.

China landslide – चीनच्या नैऋत्येकडील चोंगोइंग शहरात दरड कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या ३४ जणांचा सोध घेण्याचे काम अजूनही अव्याहतपणे सुरू आहे. दरड कोसळल्यामुळे किमान ८ जण ठार झाले आहेत.
शुक्रवारी सकाळी पेंगशुइ कौंटीतील डोंगरपायथ्याशी असलेल्या रहिवासी इमारतींवर विशाल दरड आणि डोंगराची माती कोसळली होती.
ही दरड कोसळल्यानंतर या भागातील डोंगरपायथ्याजवळच्या एक किलोमीटर परिघातील सर्व २१ इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. येथील १,१०० रहिवाशांना दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आले आहे.
जखमी झालेल्या १० पैकी एकाला रुग्णालयातून सोडले आहे. तर इतर ९ जणांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते आहे. ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेले ८ जण मरण पावले असल्याचे आढळून आले होते.
मदत आणि बचाव पथकातील कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी एका व्यक्तीला ढिगाऱ्यातून बाहेर काढले. तर इतरांचा शोध अजूनही सुरू आहे.





