पुणे जिल्हा | ब्राँडबँड इंटरनेट योजनेत 34 कोटींचा भ्रष्टाचार

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – देशातील सुमारे 27 हजार ग्रामपंचायती ब्राँडबँड इंटरनेट ऑप्टीकल फायबर नेटवर्कद्वारे जोडण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्यसरकारच्या 34 हजार कोटी रुपयांच्या या महत्वकांक्षी योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे.
भ्रष्टाचार करणार्या संबंधित अधिकारी राजकीय नेते आणि संबंधित कंपनीवर कारवाई करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व कोहिनकर वाडीचे आदर्श माजी सरपंच कुंडलिक कोहिनकर मंगळवारी (दि. 20) खेड पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले आहे.
सामाजिक कार्यकर्ते कुंडलिक कोहिनकर यांनी शासनाच्या संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केला मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. यासह पुणे जिल्ह्यातील जन सुविधा योजनेतील रस्ते हे अनुशेष न भरता काही गावांना झुकते माप दिले गेले मागणी असताना रस्त्याची कामे केली नाहीत
त्या ठिकाणी जनहित न पाहता व्यक्तिगत हित पाहिले गेले या जनहित योजनेमध्ये खुप मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाला आहे हे पुराव्यानिशी तक्रार करूनही शासनाकडून कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही उलट पुणे जिल्हा परिषदेने पुणे आयुक्तांना चुकीच्या पद्धतीची माहिती दिली व संबंधित सर्व प्रशासकीय अधिका-यांनी एकमेकांना पाठीशी घालण्याचे काम केले.
संबंधीत तक्रारी विषयी लोक आयुक्तांनी आदेश देवुनही आज तागात कोणत्याही प्रकारचा अहवाल लोक आयुक्तांना पाठविण्यात आलेला नाही असे आंदोलनकर्ते कुंडलिक कोहीनकर यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, कोहिनकर यांनी केलेल्या उपोषणास विविध संस्था, संघटना राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.उपोषणस्थळी आज इतके मान्यवरांनी भेटी देऊन या कामाच्या चौकशीची मागणी केली.
पैसे सरकारने लाटले
ग्रामपंचायती ब्राँडबँड इंटरनेट ऑप्टीकल फायबर नेटवर्कद्वारे ही सुविधा आतापर्यंत सुरू व्हायला पाहिजे; मात्र तसे झाले नाही. केबल ग्रामपंचायती ते पंचायत समिती पर्यंत टाकल्या आहेत.ही योजना राबविणारे कार्यालय कुठे आहे.
याबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती नाही. याबाबत आपण सर्वत्र माहिती अधिकार कायद्याखाली पत्रव्यवहार केला मात्र चुकीची माहिती मिळत आहे. या योजनेतील सर्व पैसे लाटण्याचे काम सरकारने केले आहे. याची चौकशी झालीच पाहिजे, असे कोहिनकर यांनी नमूद केले.





