Pimpri : शेअर बाजाराच्या नावाखाली ३३ लाखांची फसवणूक

पिंपरी : शेअर बाजाराच्या नावाखाली एका व्यक्तीची ३३ लाख ४० हजार ८८५ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना बाणेर येथे घडली. याबाबत ४१ वर्षीय व्यक्तीने सोमवारी (दि. ६) बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी बनावट सॉफटवेअर ॲप जीएफएसएल (जिओजित फायनान्सीअल सर्व्हिसेस लि.) या कंपनीचे जयंत पिरॅमल (मोबाइल नं. ७०५८७६९३८८) आणि जीएफएसएल सेक्युरीटी एजंट (मोबाइल नं. ८७९७२०२४२९) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १० मे २०२४ ते २७ मे २०२४ या कालावधीत बाणेर येथे घडली.
आरोपींनी जीएफएसएस जिओजित फायनान्सीअल सर्विसेस लि. या कंपनीचे बनावट सॉफ्टवेअर ॲप बनविले. त्याद्वारे ऑनलाइन लिंक पाठवून सुरुवातीला काही परतावा देत फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ३३ लाख ४० हजार ८८५ रुपयांची वेगवेगळ्या शेअर्स आणि आयपीओमध्ये गुंतवण्यास सांगितले.
फिर्यादी यांना मिळणारा परतावा व फिर्यादी यांची मुळ भरलेले एकूण ३३ लाख ४० हजार ८८५ रुपये रक्कम फिर्यादी यांना परत न करता आर्थिक पसवणुक केली आहे.





