रेल्वेच्या आशेने 300 नागरिक जमले उरुळी कांचन स्टेशनवर
Updated On:

उरुळी कांचन – परप्रांतीयांसाठी पुणे जिल्ह्यातून पहिली रेल्वे दि. 7 मे रोजी रवाना झाली. आता दररोज रेल्वे सोडणार असल्याचा गैरसमज अनेक मजुरांना झाला व 300 पेक्षा अधिक मजूर उरुळी कांचन येथील रेल्वे स्टेशनवर जमा झाले.
उरूळी येथून दररोज रेल्वे सुटणार, हा गैरसमज होऊन कोंढवा, कात्रज, मुंढवा, हडपसर अशा अनेक भागातून लोक रेल्वे ट्रॅकमार्गे पायी उरुळी कांचन येथे आले. पण, रेल्वे नसल्याने ते तिथेच थांबले. यावेळी स्थानिकांनी 300 लोकांची जेवणाची सोय केली. लहान मुलांना जाताना पुन्हा जेवणाची सोय केली. त्यांना पुन्हा कात्रज, कोंढवा, मुंढवा, हडपसर येथील घरी जाण्यासाठी 4 गाड्यांची सोय करून सुखरूप घरपोच केले.





