पुणे शहरात १५ नवे कोरोनाबाधित !
Updated On:

पुणे : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यातही मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. दरम्यान, आज पुणे शहरात नव्याने १५ रुग्ण आढळले आहेत. याविषयीची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली
शहरात १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ११ रुग्ण नायडू रुग्णालयात तर ४ जण ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत. आता पुणे शहरात रुग्णांची संख्या १९० झाली असून जिल्ह्यातील संख्या २२५ झाली आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.





