Nagar | विविध रस्त्यांसाठी ३.५० कोटी निधीस मान्यता

कोपरगाव, (प्रतिनिधी): – कोपरगाव तालुक्यातील रस्ते विकासाचा मोठा अनुशेष भरून काढताना उर्वरित ज्या- ज्या रस्त्यांची कामे पूर्ण करणे गरजेचे होते, त्या रस्त्यांसाठी निधी मिळावा, यासाठी आ. आशुतोष काळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
त्या पाठपुराव्यातून मतदार संघातील विविध रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेतून ३.५० कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली.
मतदार संघातील प्रत्येक खराब रस्त्यासाठी निधी मिळावा, यासाठी आ.आशुतोष काळे यांचा सततचा पाठपुरावा असल्यामुळे या पाठपुराव्यातून मतदार संघातील विविध महत्वाच्या रस्त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेतून ३.५० कोटीच्या खर्चास प्रशासकीय मिळाली आहे.
यामध्ये कोपरगाव मतदार संघातील वारी-बापतरा या रस्त्यासाठी ५० लाख, सावळगाव राधु पाटील उकिरडे घर ते राजेंद्र वाळूंज घर रस्ता करणे ५० लाख व कोकमठाण येथील इंटरनॅशनल स्कूल ते प्र.रा.मा.०८ ला मिळणाऱ्या रस्त्यासाठी ५० लाख, एमडीआर ८ ते बक्तरपूर गावापर्यंत रस्ता करणे ४० लाख,
ओगदी ते उंदीरवाडी तालुका हद्द रस्ता ४० लाख, काळे वस्ती ते कोळपेवाडी रस्ता ४० लाख, मनेगाव ते तळेगाव रस्ता ४० लक्ष, कोकमठाण ते माळवाडी प्ररामा ०८ ला जोडणारा रस्ता ४० लक्ष, असा एकूण ३.५० कोटीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
त्यामुळे मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच या रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रकिया पूर्ण होऊन रस्त्यांची कामे सुरु होणार आहे. त्यामुळे नागरिकांना खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या त्रासातून मुक्तत्ता होणार आहे.





