पुणे जिल्हा | राज्य आपत्ती सौम्यीकरणमधून जिल्ह्याला 267 कोटींचा निधी मंजूर

पळसदेव, (वार्ताहर)- 15 वित्त आयोगाने मंजूर केलेल्या महाराष्ट्र राज्य आपत्ती सौम्यीकरना निधी अंतर्गत पुणे जिल्ह्यातील दरड प्रतिबंध उपाय योजनाच्या कामासाठी नुकताच कोट्यवधी रुपयाचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला मंजूर झाला आहे.
या योजने अंतर्गत पुणे जिल्ह्यातील इंदापूरसाठी सुमारे 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्याचा शासन निर्णय नुकताच झाला आहे.
आमदार भरणे यांनी पाठपुरावा करून इंदापूर तालुक्यातील मौजे दगडवाडी येथे नीरा नदीच्या पुराच्या पाण्यापासून संरक्षण व्हावे यासाठी संरक्षण भिंत बांधणेसाठी सुमारे 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नुकताच याबाबत शासन निर्णय झाला आहे.
नुकत्याच झालेल्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत या निधीला मंजुरी मिळाली आहे. इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील इंदापूर, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, वेल्हे, हवेली व मावळ या तालुक्याला सुमारे 267 कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर झाला आहे.
या बाबत राज्य मंत्री मंडळात नुकताच निर्णय झाला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या सौमीकरण अंतर्गत जिल्ह्यातील पूर, दरड प्रतिबंध उपाययोजना करण्यासाठी विविध कामे करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
संरक्षक भिंत बांधणे, आरसीसी भिंत बांधणे, दरड प्रवण क्षेत्रात प्रतिबंधक संरक्षक भिंत बांधणे, जमिनीची कामे करणे, भराव टाकणे, गटार बांधणे अशी सुमारे 58 कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील आठ तालुके मिळून ही 58 कामे टाकण्यात आली आहेत.
यामध्ये सर्वाधिक मावळ 18, आंबेगाव 16, जुन्नर 12, खेड 6, वेल्हे 2 व हवेली, भोर व इंदापूर तालुक्यातून प्रत्येकी 1 का कामाला मंजुरी देण्यात आली आहे. ही कामे करताना नव्याने भूसंपादन कोणतेही नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.





