मुंबईतील रेल्वे अपघातात 26,500 जणांचा मृत्यू, ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद, “हिच काय आमच्या जिवाची किंमत?” अमित ठाकरेंचा सवाल

Amit Thackeray on Devendra Fadnavis | राज्यातील महापालिकांच्या प्रचार सभांदरम्यान अनेक राजकीय नेतेमंडळींकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी राज्यातील काही समस्या निदर्शनास आणून त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
अमित ठाकरे यांनी आपल्या व्हिडिओमधून शेतकरी आत्महत्या, महागाई, महिला सुरक्षा, प्रदूषण आणि राजकारणामध्ये झालेला विकृतपणा यावर भाष्य करत या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे द्यावेच लागतील असं आपल्या व्हिडिओमधून म्हटलं आहे.
अमित ठाकरे यांनी हा व्हिडिओ कोणत्याही प्रचारासाठी नसून एका सामान्य नागरिकाचा मुख्यमंत्र्यांना सवाल असल्याचे ते म्हणाले. “मी राजसाहेबांचा मुलगा म्हणून नाही, कोणत्याही पक्षाचा नेता म्हणून नाही, तर एक सामान्य नागरिक म्हणून बोलतोय, मी तुमचा प्रचार बघतोय, मी तुमच्या मुलाखती बघतोय. पण मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला जे प्रश्न विचारले गेले पाहिजेत, दुर्दैवाने ते विचारले जात नाहीत. तेच मी आज विचारायला आलो आहे. Amit Thackeray on Devendra Fadnavis |
गेल्या सात महिन्यांमध्ये राज्यात 93 मुली गायब झाले असताना, बलात्कार केस वाढत असताना आपण आरोपीला तिकीट देता? या राज्यात आपण गृहमंत्री म्हणून महिला सुरक्षित वाटतात का? अशी विचारणा ठाकरे यांनी केली आहे. Amit Thackeray on Devendra Fadnavis |
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक सामान्य नागरिक म्हणून माझे काही गंभीर प्रश्न… pic.twitter.com/8PIqIcmFJf
— Amit Thackeray (@amitrthackeray) January 14, 2026
केंद्रामध्येही आपली सत्ता असूनही महागाई कमी का झाली नाही?
पुढे ते म्हणाले की, 2014 पासून ते 2026 पर्यंत आपली सत्ता आहे. या कार्यकाळामध्ये आपण मुख्यमंत्री राहिला, उपमुख्यमंत्री राहिला, केंद्रामध्येही आपली सत्ता आहे, असं असूनही महागाई कमी का झाली नाही? अशी विचारणा त्यांनी केली आहे. तसेच सोलापूरमध्ये झालेल्या खून प्रकरणांमध्ये त्या कुटुंबाला आपल्याला आधार द्यावासा का वाटलं नाही अशीही विचारणा अमित ठाकरे यांनी आपल्या व्हिडिओमधून केली आहे.
मुंबईतील रेल्वे अपघातात 26500 हून अधिक जणांचा मृत्यू
प्रदूषणाचा प्रश्न उपस्थित करताना त्यांनी म्हटले की, आपल्या शहरांचा AQI खराब होत आहे. त्यामुळे अस्थमा, कॅन्सर, हृदयविकारासारखे आजार वाढत आहेत, त्यामुळे स्वच्छ हवा का मिळली नाही? शाळा कॉलेज परिसरामध्ये ड्रग्ज विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. पुढील पिढी बर्बाद होत असताना ते तुम्हाला दिसत नाही का? देशभरातील शेतकरी आत्महत्यांपैकी 38 टक्के महाराष्ट्रातील आहे. RTI च्या माहितीनुसार गेल्या 10 वर्षात मुंबईतील रेल्वे अपघातात 26500 हून अधिक जणांचा मृत्यू झालाय. हिच काय आमच्या जिवाची किंमत? असा थेट सवाल अमित ठाकरे यांनी केला आहे. Amit Thackeray on Devendra Fadnavis |
हेही वाचा:





