मुंबई – बॉलीवूड अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकलेल्या कामगारांना आपापल्या घरी जाण्यासाठी मोलाची मदत करत आहे. आतापर्यंत हजारो कामगारांसाठी सोनू सूद हा देवदूत बनून पुढे आला आहे. या कार्यामुळे सर्वांकडून त्याचे कौतुक केले जात आहे. यातच पुन्हा एकदा सोनुने महाराष्ट्र पोलिसांसाठी तब्बल २५ हजार फेस शिल्ड दिल्या आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसंच त्यांनी सोनू सूदचे आभारही मानले आहेत.
I thank @SonuSood Ji for your generous contribution of giving 25,000 #FaceShields for our police personnel. pic.twitter.com/bojGZghy23
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) July 16, 2020
अनिल देशमुख यांनी ट्विट केले आहे की,’. “आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी २५ हजार फेस शिल्ड दिल्याबद्दल सोनू सूद यांचे आभार,” असं कॅप्शनही त्यांनी या फोटोला दिलं आहे. सोनू सूदच्या या कार्यांबद्दल अनेकांकडून त्याची स्तुतीही करण्यात आली आहे. सोशल मीडियावर या अभिनेत्याचे भरभरून कौतुक केले जात आहे.