ICICI बँकेच्या नफ्यात 25 टक्के वाढ

मुंबई, – बँकांच्या नफ्यावर दबाव येण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने जाहीर केलेल्या दुसर्या तिमाहीच्या ताळेबंदात बँकेचा नफा 25.7% वाढून 11,053 कोटी रुपये इतका झाला असल्याची माहिती जाहीर केली आहे.
गेल्या वर्षी तिसर्या तिमाहीत बँकेला 8,792 कोटी रुपयांचा नफा झाला होता. या बँकेचा स्टँड अलोन पातळीवरील नफा 23.6 टक्क्यांनी वाढून 10,272 कोटी रुपये इतका झाला आहे. बँकेचे व्याजातील उत्पन्न 13.4 टक्क्यांनी वाढून 18,678 कोटी रुपये झाले आहे. या तिमाहीत बँकेची ढोबळ व निव्वळ अनुत्पादक मालमत्ता कमी झाली असल्यामुळे बँकेला खराब कर्जापाटी केवळ 1,049 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे. गेल्या वर्षी यासाठी बँकेला यासाठी 2,257 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली होती.
कोटक बँकेचा नफा वाढला
दरम्यान खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेला तिसर्या तिमाहीत झालेला निव्वळ नफा 6.75 टक्क्यांनी वाढून 4,265 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहित बँकेला 3,995 कोटी रुपयांचा नफा झाला होता. दरम्यान बँकेला या तिमाहीत खराब कर्जापोटी 579 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे. गेल्या वर्षी ही रक्कम 178 कोटी रुपये इतकी होती. बँकेच्या ढोबळ अनुत्पादक मालमत्तेत किंचित वाढ होऊन ती 1.73% इतकी झाली आहे. बँकेची भांडवल पर्याप्तता 19 टक्क्यावर आहे. ही बाब समाधानकारक असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी तिसर्या तिमाहीत हेे प्रमाण 20.03% इतके होते.
आयडीबीआय बँकेचा नफा वाढला
दरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँकेचा नफा तिसर्या तिमाहित तब्बल 57 % वाढून 1,458 कोटी रुपये इतका झाला आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्राबाबत झालेली नकारात्मक भावना कमी होण्यास मदत झाली आहे. गेल्या वर्षी तिसर्या तिमाहित या बँकेला 927 कोटी रुपयांचा नफा झाला होता. बँकेचे व्याजातील उत्पन्न वाढून 6,541 कोटी रुपये इतके झाले आहे. गेल्या वर्षी तिसर्या तिमाहीत ही रक्कम 5,231 कोटी रुपये इतकी होती. बँकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता अजूनही 4.69 टक्क्यावर आहे, जी की गेल्या वर्षी तब्बल 13.82% इतकी होती. तर बँकेची निव्वळ अनुत्पादक मालमत्ता केवळ 0.34% इतकी नोंदली गेली आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सार्वजनीक क्षेत्रातील युनियन बँकेने आपला ताळेबंद जाहीर केला असून या बँकेला तिसर्या तिमाहीत झालेला नफा 60 टक्क्यांनी वाढून 3,590 कोटी रुपये इतका झाला आहे व्यक्त केली आहे.





