धक्कादायक ! बिहारमध्ये एकाच दिवसात 22 जण बुडाले
Updated On:

पाटणा – बिहारमध्ये विविध ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये तब्बल 22 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली आहे. विशेष म्हणजे यातील बहुतेक लोक हे “जिवीतपुत्रिका’ या सणादरम्यान नदीत स्नान करताना घडल्या आहेत. बिहारमध्ये हा आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी हा सण साजरा केला जातो.
एकाच दिवशी इतके लोक बुडूण दगावल्याने राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृत्यांप्रती सद्भावना व्यक्त केली असून त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर केली आहे. सर्वाधिक पाच घटना या भोजपूर जिल्हात घडल्या असून त्यापाठोपाठ जेहानाबादमध्ये चार, रोहतस व पाटण्यात प्रत्येकी तीन, दारभंगा व नावडा येथे प्रत्येकी दोन तर कैमूर, माधीपूरा व औरंगाबाद येथे प्रत्येकी एक असे एकूण 22 लोक बुडाल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.





