Jobs Report : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी! नवीन नोकऱ्या वाढणार
Jobs Report : 2026 च्या दुसऱ्या सहामाहीत भारतात नवीन नोकऱ्या वाढण्याची शक्यता. 79% HR अधिकाऱ्यांना Job Creation ची अपेक्षा; IT, Marketing आणि Analyticsमध्ये संधी.

Jobs Report : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. 2026 च्या दुसऱ्या सहामाहीत म्हणजेच जुलै ते डिसेंबरदरम्यान देशात नवीन नोकऱ्या वाढण्याची शक्यता आहे. 79 टक्के HR अधिकाऱ्यांनी नवीन नोकऱ्या निर्माण होतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
Naukri च्या H2 2026 Hiring Outlook अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या अहवालासाठी विविध क्षेत्रांतील 540 हून अधिक वरिष्ठ HR अधिकारी आणि भरती करणाऱ्या अधिकाऱ्यांची मते घेण्यात आली.
97 टक्के HR अधिकाऱ्यांना भरती वाढण्याची अपेक्षा –
अहवालानुसार, 97 टक्के HR अधिकाऱ्यांना 2026 च्या दुसऱ्या सहामाहीत नवीन तसेच रिक्त झालेल्या पदांसाठी भरती सुरू राहील, असे वाटते. त्यामुळे नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आगामी काळात चांगल्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
रिअल इस्टेट आणि FMCG क्षेत्रात जास्त संधी –
नवीन नोकऱ्यांच्या बाबतीत रिअल इस्टेट क्षेत्र सर्वात पुढे आहे. या क्षेत्रातील 86 टक्के HR अधिकाऱ्यांना नवीन नोकऱ्या वाढतील, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर FMCG क्षेत्राचा क्रमांक असून 85 टक्के HR अधिकाऱ्यांनी सकारात्मक अंदाज व्यक्त केला.
IT आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातही भरती वाढण्याची शक्यता आहे. या क्षेत्रातील 83 टक्के HR अधिकारी भरतीबाबत आशावादी आहेत. याआधी हा आकडा 79 टक्के होता.
कोणत्या क्षेत्रात नोकऱ्या मिळणार?
आगामी काळात Business Development, Marketing आणि IT क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भरती होण्याची शक्यता आहे. Business Development मध्ये 45 टक्के, Marketing मध्ये 37 टक्के आणि IT मध्ये 31 टक्के HR अधिकाऱ्यांनी जास्त भरती होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
BFSI क्षेत्रात वित्त क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मागणी राहणार आहे. FMCG आणि उत्पादन क्षेत्रात Operations पदांवर भरती होण्याची शक्यता आहे.
AI मुळे नोकऱ्या जाणार का?
AI मुळे नोकऱ्यांवर परिणाम होण्याची चर्चा सुरू असली तरी 86 टक्के HR अधिकाऱ्यांना AI मुळे मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कमी केले जातील, असे वाटत नाही.
उलट IT आणि BFSI क्षेत्रातील 20 टक्क्यांहून अधिक HR अधिकाऱ्यांना पुढील सहा महिन्यांत AI मुळे नवीन नोकऱ्या निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे. IT, Marketing आणि Analytics या क्षेत्रात AI मुळे नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.
Info Edge चे MD आणि CEO हितेश ओबेरॉय यांनी सांगितले की, भारताच्या रोजगार बाजारात हळूहळू सुधारणा होत आहे. AI मुळे अनेक क्षेत्रांत नवीन प्रकारच्या नोकऱ्या निर्माण होत आहेत. त्यामुळे कंपन्यांसोबतच कर्मचाऱ्यांनीही नवीन कौशल्ये शिकणे महत्त्वाचे ठरणार आहे.





