थाटात घरी घेऊन जा अडीच कोटींची SUV, टोयोटाची नवी Land Cruiser 300 भारतात लाँच, पाहा वैशिष्ट्ये

2025 Toyota Land Cruiser Launched | टोयोटाने भारतीय बाजारात शानदार एसयूव्ही लँड क्रूजर 300 ला लाँच केले आहे. कंपनीने या लग्झरी एसयूव्हीला ZX आणि GR-S या दोन व्हेरिएंट्ससह लाँच केले आहे. कंपनीने या एसयूव्हीला व्ही6 डिझेल इंजिनसह सादर केले असून, गाडीची किंमत अडीच कोटी रुपयांपर्यंत आहे. 2025 Toyota Land Cruiser 300 च्या किंमत आणि फीचर्सविषयी जाणून घेऊयात.
2025 Toyota Land Cruiser 300 ची किंमत
2025 Toyota Land Cruiser 300 ला कंपनीने ZX आणि GR-S व्हेरिएंट्ससह सादर केले आहे. कारच्या ZX व्हेरिएंटची किंमत 2.31 कोटी रुपये (एक्स-शोरूम) आणि GR-S व्हेरिएंटची किंमत 2.41 कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे. एसयूव्हीचे बुकिंग सुरू झाले आहे.
2025 Toyota Land Cruiser 300 चे वैशिष्ट्ये
नवीन 2025 Toyota Land Cruiser 300 ला कंपनीने ट्विन टर्बो चार्ज व्ही6 डिझेल इंजिनसह लाँच केले आहे. हे इंजिन 304bhp पॉवर आणि 700nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनला 10-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह जोडण्यात आले आहे.
याशिवाय, एसयूव्हीमध्ये मल्टी-टेरेन सेलेक्ट (MTS) आणि मल्टी-टेरेन मॉनिटर सारखी आधुनिक टेक्नोलॉजी दिली आहे. इंटेरियरबद्दल सांगायचे तर यात प्रीमियम लेदर अपहोल्स्ट्रीसह सॉफ्ट-टच मटेरियल आणि एलीगेंट ट्रिम फिनिशिंग दिली आहे.
ही एसयूव्ही 8-वे पॉवर एडजस्टेबल फ्रंट सीट्ससह येतो. ZX व्हेरिएंटमध्ये ग्राहकांना न्यूट्रल बेंझ आणि ब्लॅक असे दोन रंगात इंटेरियरचा पर्याय मिळतो. GR-S व्हेरिएंटमध्ये स्पोर्टी ब्लॅक आणि डार्क रेड अपहोल्स्ट्री दिली आहे. याशिवाय, 4-झोन क्लाइमेट कंट्रोल सिस्टम आणि सनरूफ मिळेल. ही एसयूव्ही TNGA-F प्लॅटफॉर्मवर आधारित असून, यामध्ये पॉवरफुल इंजिन, आधुनिक सेफ्टी फीचर्स, शानदार डिझाइन दिले आहे.





