2025 Nobel Prize in Medicine: रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित करण्यासाठी क्रांतिकारी शोध; दोन अमेरिकन, एका जपानी शास्त्रज्ञाला पुरस्कार

2025 Nobel Prize in Medicine: वैद्यकीय शास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा झाली असून, यंदा ‘फिजिओलॉजी किंवा मेडिसिन’ विभागाचा नोबेल अमेरिकेतील मॅरी ई. ब्रुन्को, फ्रेड रॅम्सडेल आणि जपानचे शिमोन सकागुची या तिघा वैज्ञानिकांना मिळाला आहे.
शरीराची शक्तिशाली रोगप्रतिकारक प्रणाली नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अन्यथा ती आपल्या स्वतःच्या अवयवांवरच हल्ला करू शकते. या संबंधात केलेल्या अभूतपूर्व शोधांसाठी मॅरी ई. ब्रुन्को, फ्रेड राम्सडेल आणि शिमोन सकागुची यांना २०२५ चा फिजिओलॉजी किंवा मेडिसिनचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार शरीराच्या रक्षा प्रणाली (इम्यून सिस्टम) ची अधिक चांगली समज विकसित करण्याच्या शोधासाठी आहे. या शोधांनी संशोधनाला नवीन दिशा दिली असून, कर्करोग आणि स्वप्रतिकारक रोगांच्या उपचारांना अधिक प्रभावी बनवण्यास मदत होईल, असे नोबेल समितीने सांगितले.
BREAKING NEWS
The 2025 #NobelPrize in Physiology or Medicine has been awarded to Mary E. Brunkow, Fred Ramsdell and Shimon Sakaguchi “for their discoveries concerning peripheral immune tolerance.” pic.twitter.com/nhjxJSoZEr— The Nobel Prize (@NobelPrize) October 6, 2025
गेल्या वर्षी हा पुरस्कार अमेरिकन नागरिक विक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना सूक्ष्म ‘आरएनए’ (रायबोन्यूक्लिक ऍसिड) च्या शोधासाठी देण्यात आला होता. १९०१ ते २०२४ या काळात हा पुरस्कार ११५ वेळा जाहीर झाला असून, आतापर्यंत २२९ विजेत्यांना हा सन्मान मिळाला आहे.





