स्वस्तात मस्त! 6 एअरबॅग्ससह येणारी देशातील सर्वात स्वस्त कार लाँच, किंमत फक्त…

Maruti Suzuki Alto K10 | भारतीय बाजारात कमी बजेटमध्ये येणाऱ्या असंख्य कार उपलब्ध असल्या तरीही मारुती सुझुकीच्या अल्टो के10 ची लोकप्रियता आजही कायम आहे. कमी किंमतीत येणाऱ्या या कारला दरमहिन्याला शेकडो ग्राहक खरेदी करतात. आता कंपनीने प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करत या कारमध्ये मोठा बदल केला आहे. कंपनीने 2025 Alto K10 ला आता स्टँडर्ड 6 एअरबॅग्ससह लाँच केले आहे.
यापुढे नवीन Maruti Suzuki Alto K10 मध्ये ग्राहकांना 6 एअरबॅग्स मिळणार आहे. यामुळे आता आधीच्या तुलनेत कारच्या किंमतीत थोडी वाढ देखील झाली आहे.
Maruti Alto K10 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
नवीन Maruti Alto K10 मध्ये सेफ्टी फीचर्स वगळता इतर कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही. कारचे पेट्रोल आणि सीएनजीसह येणारे 8 मॉडेल उपलब्ध आहेत. एअरबॅग्स फीचरमुळे कारच्या किंमतीत जवळपास 16 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.
कारच्या इंजिनबद्दल सांगायचे तर यात आधीप्रमाणेच 1.0 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, हे 67 PS पॉवर आणि 89 Nm टॉर्क निर्माण करते. तर सीएनजी व्हेरिएंट इंजिन 57 PS पॉवर आणि 82 Nm टॉर्क निर्माण करते. या इंजिनला 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससोबत जोडण्यात आले आहे.
नवीन एअरबॅग्स फीचरमुळे कार आता अधिक सुरक्षित झाली आहे. कंपनीने या कारमध्ये 6 एअरबॅग्सशिवाय रियर पार्किंग सेन्सर, मागील सर्व प्रवाशांसाठी 3-पॉइंट सीट बेल्ट, लगेज-रिटेन्शन क्रॉसबार, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD) हे सेफ्टी फीचर्स दिले आहेत.
Maruti Alto K10 ची किंमत
जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन Maruti Alto K10 च्या किंमतीत जवळपास 16 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. ही वाढ व्हेरिएंटनुसार वेगवेगळी आहे. कार वेगवेगळ्या 8 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. कारच्या स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत 4.23 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. तर टॉप व्हेरिएंट VXI CNG ची किंमत 6.21 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.





