करोना संसर्गाने परदेशांत ‘एवढ्या’ भारतीयांचा मृत्यू
Updated On:

नवी दिल्ली – करोना संसर्गाने परदेशांत 2 हजार 72 भारतीयांचा मृत्यू झाला. सौदी अरेबियात सर्वांधिक 906 भारतीय दगावले, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.मुरलीधरन यांनी गुरूवारी राज्यसभेत दिली.
संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) 375, कुवेतमध्ये 369, तर ओमानमध्ये 166 भारतीयांनी करोनाबाधेमुळे प्राण गमावले. ती संख्या बहरीनमध्ये 48, कतारमध्ये 34 आणि सुदान, नायजेरियात प्रत्येकी 23 इतकी आहे.
इटलीत 15, फ्रान्समध्ये 7 भारतीयांच्या मृत्यूची नोंद झाली. इराण, इराक आणि नेपाळमध्येही करोना संसर्गाने काही भारतीय मृत्युमुखी पडले. आखाती विभागात सुमारे 85 लाख भारतीय राहतात. त्यातील अनेक जण करोना संकटामुळे भारतात परतले, असेही मुरलीधरन यांनी नमूद केले.





