terrorists killed : काश्मीरमधील चकमकीत २ दहशतवादी ठार
Updated On:

श्रीनगर – सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीरमधील चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा केला. ती घटना कुलगाम जिल्ह्यातील जंगलात घडली. संबंधित जंगलात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती गुप्तचरांकडून देण्यात आली. त्यानंतर सुरक्षा दलांनी शुक्रवारपासून विशेष मोहीम हाती घेतली.
सुरक्षा जवानांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा पथकाने प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये शुक्रवारी सायंकाळी चकमक झडली. सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी मोहीम रात्रीच्या सुमारास थांबवली.
त्यानंतर शनिवारी सकाळी सुरक्षा जवान आणि दहशतवादी पुन्हा आमनेसामने आले. त्यावेळी घडलेल्या चकमकीत २ दहशतवादी ठार झाले. त्यांची ओळख तातडीने पटू शकली नाही. त्यामुळे ते कुठल्या संघटनेचे सदस्य आहेत ते तूर्त समजू शकलेले नाही.





