Miraj Crime News : महाराष्ट्र हळहळला..! पैशांचा वाद ठरला संसारांसाठी काळ; 2 सख्ख्या बहिणी एकाच वेळी झाल्या विधवा, मिरज तालुक्यातील हृदयद्रावक घटना
Miraj Crime News : पैशांच्या क्षुल्लक देवाण-घेवाणीच्या हिशोबावरून झालेला वाद दोन कुटुंबांच्या संसाराचा कर्दनकाळ ठरल्याची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेळंकी येथे घडली आहे.

Miraj Crime News : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेळंकी येथे पैशांच्या देवाण-घेवाणीवरून झालेल्या वादातून दोन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महेशकुमार ब्रिजलाल गौतम यांचा मारहाणीत मृत्यू झाला, तर या प्रकरणातील मुख्य संशयित बबलू भगवती याने दुसऱ्या दिवशी जीवन संपवले. (Miraj Crime News)
विशेष म्हणजे, मृत महेशकुमार आणि बबलू हे नात्याने साडू होते. त्यांच्या पत्नी सख्ख्या बहिणी असल्याने या घटनेमुळे दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Miraj Crime News)
पैशांच्या हिशोबावरून वाद, मारहाणीत एकाचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, महेशकुमार गौतम, बबलू भगवती, दिनेश मोहन आणि मुलचंद बल्ली गौतम हे कामानिमित्त बेळंकी येथे आले होते. काम संपल्यानंतर गावी परत जाण्याच्या तयारीत असताना त्यांच्यात पैशांचा हिशोब सुरू होता. याच देवाण-घेवाणीवरून बबलू आणि महेशकुमार यांच्यात वाद झाला. (Miraj Crime News)
या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. बबलू आणि त्याच्या दोन साथीदारांनी महेशकुमार यांच्यावर लाकडी दांडक्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत महेशकुमार यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाले. (Miraj Crime News)
पोलिसांकडून शोधमोहीम सुरू असतानाच संशयिताची आत्महत्या
घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक अजित कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली. (Miraj Crime News)
दरम्यान, शनिवारी सकाळी मुख्य संशयित बबलू भगवती याचा मृतदेह जवळच्या शेतात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. प्राथमिक पाहणीत त्याने आत्महत्या केल्याचे दिसून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Miraj Crime News)
दोन सख्ख्या बहिणींवर दुःखाचा डोंगर
या घटनेतील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे महेशकुमार आणि बबलू हे नात्याने साडू होते. दोघांच्या पत्नी सख्ख्या बहिणी आहेत. त्यामुळे एका वादातून दोन कुटुंबांतील दोन पुरुषांचा मृत्यू झाला असून दोन्ही बहिणींवर वैधव्याचे दुःख ओढवले आहे. (Miraj Crime News)
पोलीस निरीक्षक अमित पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मृत व्यक्ती नात्याने साडू होते. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसऱ्या मृत्यूच्या घटनेबाबतही पोलिसांकडून आवश्यक कारवाई करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. (Miraj Crime News)




