येत्या 5 वर्षात 2 कोटी घरे बांधणार, सर्वसामान्य नागरिकांसाठी निर्मला सीतारामन यांची घोषणा

Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचे अर्थसंकल्प सादर केले. निर्मला सीतारमण यांनी सबका साथ-सबका विकास या आमच्या मंत्राचा वापर करून देशाचा विकास करण्यात आला. आमच्या सरकारने व्यापक विकासाची कामे केली असे म्हणत अर्थसंकल्प वाचनास सुरूवात केली. सर्वांचे लक्ष लागलेल्या या अंतरिम बजेटमध्ये गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या चार जातींवर आमचे लक्ष आहे. त्यांच्या गरजा, त्यांच्या आकांक्षा आमच्यासाठी महत्त्वाच्या असल्याचे निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले.
यंदाच्या या बजेटमध्ये त्यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी देखील महत्त्वाची घोषणा केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुढील 5 वर्षांत ग्रामीण भागांत आणखी दोन कोटी घरं बांधणार असल्याची घोषणा यावेळी निर्मला सीतारामन यांनी केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आतापर्यंत तीन कोटी घरे बांधण्यात आली आहेत. आमच्या सरकारचे लक्ष पारदर्शक कारभारावर असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 च्या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा उल्लेख केला. या योजनेअंतर्गत ज्यांच्या घरी सौर यंत्रणा बसवली आहे त्यांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाणार असल्याची मोठी घोषणा केली. त्यामुळे यंदाच्या बजेटमधून सर्वसामान्य जनतेला काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश पुढे जात आहे. तसेच आम्ही सामान्यांच्या हितासाठी काम करत आहोत असे म्हणत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडला. 2047 पर्यंत देश विकसित देशांच्या यादीत समावेश असेल असा दावा देखील यावेळी निर्मला सीतारामन यांनी केला.





