भाजप पदाधिकाऱ्याकडे आढळला 1900 किलो गांजा; पक्षातून हकालपट्टी
Updated On:

रतलाम – भारतीय जनता पक्षाच्या मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील एका पदाधिकाऱ्याकडे 1900 किलो गांजा आढळून आला होता. हा पदाधिकारी मादकद्रव्यांच्या चोरट्या व्यापारात गुंतला असल्याचे पोलिसांना आढळून आल्यानंतर भाजपने त्याच्यावर कारवाई केली असून त्याला पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.
विवेक पोरवाल असे या पदाधिकाऱ्याचे नाव असून त्याला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. त्याच्याकडील या गांजाचा साठा ग्वाल्हेर जिल्ह्याच्या घाटीगाव येथे पकडण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याच्या कडे काम करणारो दोन ड्रायव्हर आणि त्यांचे वाहनही जप्त केले आहे. हे मादक द्रव्य नागालॅंड मधल्या दिमापुर येथून आणण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.हा साठा रतलाम येथे नेला जात होता.





