तटरक्षक दलाने बांगलादेशच्या 19 मचछिमरांना वाचवले
Updated On:

कोलकाता – भारतीय तटरक्षक दलाने बंगालच्या उपसागरात अडकलेल्या 19 बांगलादेशी मच्छिमारांची सुटका केली. मंगळवारी त्यांच्या बोटीत झालेल्या यांत्रिक अडचणीमुळे त्यांची बोट भर समुद्रात भरकटली होती.
या मच्छिमारांच्या इशाऱ्यानंतर बांगलादेश फिशिंग बोट “राणा’ भारतीय तटरक्षक दलाच्या वरड जहाजावरुन दक्षिण पूर्वेकडील पारडिप बंदरापर्यंत खेचून नेली.
बांगलादेशी मच्छिमारांना समुद्र आणि हवाई सामन्वयाने केलेल्या ऑपरेशनमध्ये वाचविण्यात आले आणि त्यांना अन्न, पाणी आणि वैद्यकीय सहाय्य यासह सर्व सुविधा देण्यात आल्या, असे भारतीय तटरक्षक दलाने सांगितले.
हे मच्छीमार 15 नोव्हेंबर रोजी कोक्सबाजारहून निघाले होते. त्यांची बोट बांगलादेशच्या अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.





