पुण्यात 17 वर्षीय युवकाचा गोळ्या झाडून खून,परिसरात खळबळ
Updated On:

तळेगाव दाभाडे – पुण्यासह परिसरात गुन्हेगारीने मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. गुन्हेगारांनाही पोलिसांचा धाक राहिला नाही हे परिसरात घडलेल्या अनेक गुन्हेगारी घटनावरून दिसून येत आहे. असे असताना आज एका 17 वर्षीय तरूणाची अज्ञाताने गोळ्या झाडून खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना तळेगाव दाभाडे येथील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनीजवळ बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
दशांत अनिल परदेशी, वय 17 असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो तळेगाव दाभाडे येथील रहिवाशी होता. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे. अनिल परदेशी मृत दशांतच्या वडिलांनी फिर्याद दाखल केली आहे.





