#BelgianIC2024 : सतरा वर्षीय भारतीय शटलर अनमोलची शानदार कामगिरी; बेल्जियम आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे जिंकले विजेतेपद…

Belgian International badminton tournament 2024 : भारताच्या 17 वर्षीय अनमोल खरब हिने शनिवारी बेल्जियम आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत तिचे पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकावले. तिने अटीतटीच्या लढतीत डेन्मार्कच्या अमाली शुल्झचा पराभव केला. यासह भारताची 17 वर्षीय महिला बॅडमिंटनपटू अनमोल खरब हिने तिच्या कारकिर्दीतील पहिले महिला एकेरीचे आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे.
Anmol Kharb shines at #BelgianInternational🥳#Badminton🏸
At just 17, the World No. 222 stuns World No. 80, Switzerland’s 🇩🇰 Amali Schulz in a thrilling final, winning 24-22, 12-21, 21-10 to claim her first senior international title ☑️
A proud moment for India 🇮🇳 and Anmol 😍… pic.twitter.com/NDnxXMhjIi
— SAI Media (@Media_SAI) September 14, 2024
पात्रता फेरीतून मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळवणाऱ्या खरब हिने 59 मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात तिच्या सातव्या मानांकित प्रतिस्पर्ध्यावर 24-22, 12-21, 21-10 असा विजय मिळवला. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय आव्हानात्मक (international challenge event) स्पर्धा आहे.
याआधी, अनमोल हिने शुक्रवारी उपांत्य फेरीत डॅनिश खेळाडू इरिना अमाली अँडरसनचा पराभव केला होता. फरिदाबाद येथील असलेली अनमोल खरब ही 2024 च्या बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाची सदस्य होती. ती सध्या जागतिक क्रमवारीत 222 व्या क्रमांकावर आहे.

