ठाण्यातील आगीत 17 गोदामे भस्मसात
Updated On:

ठाणे – ठाणे शहरातील शिळ फाटा येथील गोदाम संकुलात असलेल्या 17 प्लॅस्टिक भंगार गोदामांना शनिवारी पहाटे भीषण आग लागली, या आगीत ही सारी गोदामे जळून खाक झाली.
पहाटेच्या सुमारास लागलेल्या या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या प्रत्येकी दोन अशा एकूण चार अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि सकाळी 9 च्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली, आग नेमकी कशामुळे लागली हे अजून समजू शकले नाही.
आगीची व्याप्ती मोठी होती. घटनास्थळाच्या आसपास काही लोकवस्तीही आहे पण तिला याच्या झळा सुदैवाने पोहचू शकल्या नाहीत. घटनास्थळी आग पुर्ण विझली असली तरी तेथे अजून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.

