Bihar Election : राजकारणात मोठा भूकंप; मुख्यमंत्र्यांकडून माजी मंत्र्यांसिहत १६ बडे नेते निलंबित, नेमकं कारण काय?

Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जनता दल (युनायटेड) पक्षात मोठी घडामोड झाली आहे. मुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्ष नितीश कुमार यांनी पक्षविरोधी कारवाया आणि शिस्तभंग करणाऱ्या नेत्यांवर कठोर कारवाईचा धडाका लावला आहे. रविवारी (२६ ऑक्टोबर) पुन्हा ५ नेत्यांना निलंबित करण्यात आले आहे.
यामुळे दोन दिवसांत १६ मोठ्या नेत्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यामध्ये माजी मंत्री, आमदार आणि माजी आमदारांचा समावेश आहे. या कारवाईमुळे पक्षांतर्गत एकजूट दाखवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
कारवाईचे नेमकं कारण काय?
JDU च्या प्रदेश महासचिव चंदन कुमार सिंह यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, हे नेते पक्षाच्या अधिकृत उमेदवार आणि NDA मित्रपक्षांच्या विरोधात काम करत होते. काही नेते स्वतंत्र उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे समजले, यामुळे पक्षाची विचारधारा आणि शिस्तीचा भंग होत होता. निवडणुकीच्या तोंडावर अशा कारवायांमुळे पक्षाला धक्का बसू शकतो, म्हणून नितीश कुमार यांनी वैयक्तिकरित्या ही यादी तपासली आणि मंजुरी दिली.
हे नेते अल्पसंख्याक कल्याण आणि मतदार संघटनेच्या मुद्द्यांवर पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात सक्रिय होते, असा पक्षाचा दावा आहे. ही कारवाई पक्षाला घट्ट करण्यासाठी आणि नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा मजबूत करण्यासाठी असल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.
कोणाला केलं निलंबित?
शैलेश कुमार- माजी मंत्री, जमालपुर, मुंगेर
संजय प्रसाद, चकाई, जमुई
श्याम बहादुर सिंह, बडहरिया, सीवान
रणविजय सिंह, बड़हरा, भोजपुर
सुदर्शन कुमार, बरबीधा, शेखपुरा
अमर कुमार सिंह, साहेबपुर कमाल, बेगूसराय
डॉ. आसमा परवीन, महुआ, वैशाली
लब कुमार, नवीनगर, औरंगाबाद
आशा सुमन, कदवा, कटिहार.
दिव्यांशु भारद्वाज, मोतिहारी, पूर्वी चम्पारण.
विवेक शुक्ला, जिरादेई, सीवान
नरेंद्र कुमार नीरज उर्फ गोपाल मंडल, गोपालपूर, भागलपूर
हिमराज सिंह, कदवा, कटिहार
महेश्वर प्रसाद यादव, गायघाट, मुजफ्फरपुर
प्रभात किरण, गायघाट, मुजफ्फरपूर
संजीव श्याम सिंह, गया





