Budget 2024 : महाराष्ट्र रेल्वे सुसाट.. बजेटमध्ये मिळाला घसघसशीत निधी.. ‘इतक्या’ कोटींची करण्यात आली तरतूद

Budget 2024 : रेल्वेच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला 15 हजार 554 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. गतवर्षी महाराष्ट्रात रेल्वेसाठी 13 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील रेल्वे मार्गिकेला घसघसशीत निधी आल्याचे चित्र आहे. नवी रेल्वे मार्गिका, दुसरी, तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका यासाठी देखील निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कसारा, कर्जत आणि पुणे या रेल्वेयार्डाचे नुतनीकरण केले जाणार आहे. याशिवाय सीएसएमटी, एलटीटीच्या विकासासाठी देखील निधी दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
नवीन रेल्वे मार्गिका – तरतूद
नगर-बीड-परळी 275 कोटी
बारामती-लोणंद 330 कोटी
वर्धा-नांदेड 750 कोटी
सोलापूर-उस्मानाबाद-तुळजापूर 225 कोटी
धुळे-नार्धना 350 कोटी
कल्याण-मुरबाड बारस्ता-उल्हासनगर 10 कोटी
दुसरी, तिसरी आणि चौथी मार्गिका प्रकल्प
कल्याण-कसारा 85 कोटी
वर्धा-नागपूर 125 कोटी
वर्धा-बल्लार शाहा 200 कोटी
इटारसी-नागपूर 320 कोटी
पुणे-मिरज 200 कोटी
दौंड-मनमाड 300 कोटी
वर्धा-नागपूर 120 कोटी
मनमाड-जळगाव 120 कोटी
जळगाव-भुसावळ 40 कोटी
भुसावळ-वर्धा 100 कोटी
गेज रूपांतर
पाचोरा-जामनेर 300 कोटी
यार्ड remodeling
कसारा 1 कोटी
कर्जत 10 कोटी
पुणे 25 कोटी
सीएसएमटीसाठी प्लॅटफॉर्म लंबिकरण 10 कोटी
एलटीटी स्टेशन 2 कोटी





