15,334 नगर जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्ह

नग (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज 417 नवे करोनाबाधित आढळल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या 15334 वर पोहचली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज 506 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने 12 हजारांचा टप्पा ओलांडला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूणसंख्या 12 हजार 153 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता 79.25 टक्के इतके झाले आहे. काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजलेपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्णसंख्येत 417 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 2988 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 71, अँटीजेन चाचणीत 245 आणि खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 101 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 46, संगमनेर 03, नगर ग्रामीण 04, कॅन्टोन्मेंट 03, पारनेर 03, अकोले 08, जामखेड 01, कर्जत 01 आणि मिलीटरी हॉस्पिटल 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 245 जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा 08, संगमनेर 08, राहाता 23, पाथर्डी 17, नगर ग्रामीण 28, श्रीरामपूर 18, कॅंटोन्मेंट 09, नेवासा 16, श्रीगोंदा 25, पारनेर 15, अकोले 12, राहुरी 13, शेवगाव 12, कोपरगाव 18, जामखेड 21 आणि कर्जत 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 101 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 49, संगमनेर 18, राहाता 02, नगर ग्रामीण 12, श्रीरामपुर 02, पारनेर 04,अकोले 05, शेवगाव 01, कोपरगांव 04 आणि जामखेड 04 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज 506 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. मनपा 191, संगमनेर 36, राहाता 28, पाथर्डी 20, नगर ग्रा.40, श्रीरामपूर 24, कॅन्टोन्मेंट 06, नेवासा 24, श्रीगोंदा 18, पारनेर 25, अकोले 20, राहुरी 07, शेवगाव 28, कोपरगाव 07, जामखेड 24, कर्जत 05, आणि मिलिटरी हॉस्पिटल 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.
नगर करोना अपडेट
बरे झालेली रुग्ण संख्या: 12153
उपचार सुरू असलेले रूग्ण : 2988
आजपर्यंतचे मृत्यू :
193
एकूण रूग्ण संख्या :
15334





