‘या’ पठ्ठ्याने बनवली 150 किमी मायलेज देणारी बाईक; Video पाहून तुम्ही व्हाल थक्क !

Updated On:

Bike video : भारतीयांच्या जुगाड तंत्रज्ञानाचे जगाने कौतुक केले जाते. यावर विश्वास ठेवा किंवा नाही… पण भारतीयांनी अनोखी युक्ती शोधून प्रत्येक समस्येवर उपाय शोधला असल्याचं आपण अनेकदा पाहिलं आहे. बाईकचे मायलेज वाढवण्यासाठी मॉडिफिकेशनशी संबंधित अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील, पण आज आम्ही ज्या तंत्रज्ञानाबद्दल बोलत आहोत ते कदाचित याआधी कुठेही दिसले नसेल.

सध्या LPG गॅस वर चालणाऱ्या बाईकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इंडिया ट्रॅव्हल्स नावाच्या फेसबुक अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ गुजरातमधला असल्याचं म्हटलं जात आहे, जिथे काही लोक एलपीजी सिलिंडर लावलेल्या त्यांच्या जुन्या बाइक चालवत आहेत. विशेष म्हणजे ही LPG बाईक जबरदस्त मायलेज देत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.

व्हिडिओमध्ये काही बाइक्स दाखवल्या जात आहेत ज्यांना चालवण्यासाठी एलपीजी सिलिंडर बसवण्यात आले आहेत. बाईकच्या मागील बाजूस सिलिंडर बसवला गेला आहे जेथे लोक सहसा ट्रंक स्थापित करतात. सिलिंडर बसवण्यासाठी बाईकच्या मागच्या बाजूला कॅबिनेटसारखा बॉक्स बनवण्यात आला आहे, ज्यामध्ये 2 किलोचा एलपीजी सिलिंडर बसतो.

या सिलिंडरमधून बाहेर येणारा पाइप आतून दुचाकीच्या इंजिनपर्यंत पोहोचतो. पेट्रोल टाकीचा नॉब बंद झाल्यानंतरही बाईक चालत असल्याचे व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे, म्हणजेच बाईक गॅसवर धावू शकते. गॅसवर चालणारी ही बाईक पूर्ण टाकीवर 150 किलोमीटरपर्यंत मायलेज देऊ शकते, असे व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे.

म्हणजेच ही बाईक 2 किलो एलपीजीवर 150 किलोमीटरपर्यंत चालवता येते. त्याच वेळी, गॅसवर बाइक चालवण्याचा खर्च केवळ 50-60 पैसे प्रति किलोमीटर आहे, तर सामान्य बाईक पेट्रोलवर चालवण्याची किंमत 2-3 रुपये प्रति किलोमीटर आहे.

तुम्ही पण अशी बाईक चालवू शकता का?
मोटार वाहन कायदा (MV Act) अंतर्गत, केवळ RTO द्वारे प्रमाणित वाहनांमध्ये बदल करण्याची परवानगी आहे. जर तुम्हाला बाईकच्या इंजिन, पेट्रोल पंप किंवा इग्निशन सिस्टीममध्ये काही बदल करायचे असतील तर त्याआधी तुम्हाला स्थानिक आरटीओची परवानगी घ्यावी लागेल.

आरटीओची परवानगी मिळाल्यानंतरच हा फेरफार कायदेशीर मानला जाईल. मोटार वाहन कायद्यानुसार, सीएनजी किट बसवण्याची परवानगी फक्त जुन्या बीएस-3 दुचाकींमध्ये आहे. त्यामुळे हा आपल्या बाइकमध्ये हा फेरफार करण्याआधी मोटार वाहन कायद्याचा अभ्यास नक्की करा.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

2026-10-08 18:11:06

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

2026-10-08 17:15:33

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

2026-10-08 16:41:41

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

2026-10-08 15:47:48

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात