मुंबईत विविध पथकातील 15 गोविंदा जखमी, उपचार सुरु
Updated On:

मुंबई – मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी गोविंदा मानवी मनोरा रचून दहीहंडी फोडत आहेत. अशातच मुंबईत दुपारी 12 वाजेपर्यंत मानवी थरांवरून कोसळल्यामुळे 15 गोविंदा जखमी झाले. जखमी गोविंदांवर महापालिकेच्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
यात मुंबईतील केईएम रुग्णालयात 1, नायर रुग्णालयात 4, सायन रुग्णालयात 2, सेंट जॉर्ज हॉस्पिटलध्ये 1, पोद्दारमध्ये 4, राजावाडीमध्ये 1, एमटी अगरवार रुग्णालयात 1 आणि कुर्ला भाभा रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरु आहेत. सुदैवाने यातील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. सध्या या सर्व गोविंदांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.





