महाराष्ट्रातील तब्बल 15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : महाराष्ट्रातील ओबीसींसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्रातील 15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश होणार आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून जातीची यादी केंद्राकडे सुपूर्द करण्यात आली आहे. आरक्षणाबाबत सरकारने घेतलेला हा सर्वात मोठा निर्णय मानला जात आहे.
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गामधील काही जातींचा इतर मागासवर्गीयांच्या केंद्रीय सुचीमध्ये समावेश करण्याची शिफारस राज्य सरकारने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे केली होती. या शिफारसीच्या अनुषंगाने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने सखोल तपासणी करीत दिशानिर्देशानुसार आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या निर्देशान्वये इतर मागासवर्गीय जाती/पोटजातींचा केंद्रीय सुचीमध्ये समावेश करण्यास आयोगाकडून मान्यता देण्यात आली आहे.
कोणत्या आहेत त्या 15 जाती?
बडगुजर
सूर्यवंशी गुजर
लेवे गुजर
रेवे गुजर
रेवा गुजर
पोवार, भोयार, पवार
कपेवार
मुन्नार कपेवार
मुन्नार कापू
तेलंगा
तेलंगी
पेंताररेड्डी
रुकेकरी
लोध लोधा लोधी
डांगरी





