सरकारी कार्यालयांत आता 15% उपस्थिती
Updated On:

पुणे – लॉकडाऊनला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या टप्प्यात आता सरकारी कार्यालयांमध्ये 15 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असेल.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. याबाबत त्यांनी दि. 31 जुलैपर्यंत शासनाने वेळोवेळी दिलेली मार्गदर्शक तत्वे व अधिसूचनेत नमूद केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी आदेश दिले आहेत. पुणे जिल्ह्यात हा आदेश दिनांक 1 जुलै ते 31 जुलै 2020 पर्यंत लागू राहील. संबंधित प्रशासकीय विभागांनी या आदेशाची अंमलबजावणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.





