मुंबई – बॉलीवूड अभिनेता शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूत अभिनेत्री नसली तरी सतत चर्चेत असते. एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्रीला मागे टाकेल असे मीराचे सौंदर्य आहे. सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून तिचे अनेक फोटो ती शेअर करत असते. तिच्या फॅशन आणि स्टाईल सेन्सची नेहमीच चर्चा होत असते. सध्या ती तिच्या नव्या लुकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
मीरा राजपूतने इनस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहे. यात मीरा राजपूतने पांढरा गाऊन घातलेला दिसत आहे, ज्यासोबत तिने ऑफ-शोल्डर फिट असलेला टॉप घातला होता. ज्यावर काळे पांढरे पट्टे दिसत होते. तिच्या स्कर्टचा फिश टेल डिझाइन लुक अधिकच सुंदर दिसत आहे.
मीराने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी ड्रॉपडाउन डायमंड इयररिंग आणि अंगठ्या घातल्या आहेत. यासोबत तिने साधा सुंदर मेकअप केला आहे. मीराचे हे फोटोअनेकांच्या पसंतीस पडले आहे. सध्या तिच्या या फोटोवर लाइक आणि कमेन्टचा वर्षाव होत आहे.
Instagram पर यह पोस्ट देखें
दरम्यान, मीरा राजपूत आणि शाहिद कपूर बद्दल बोलायचे झाले तर, 2014 मध्ये त्यांनी अरेंज मॅरेज केले होते. या दोघांना दोन मुलेही आहेत. मीरा अनेकदा कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवताना दिसते.