Pune News : तळजाईत पाण्याच्या टाकीत पडून १४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी; दोन्ही पायांना फ्रॅक्चर
Pune News : पुणे महानगरपालिकेच्या (PMC) २४x७ समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीच्या बांधकाम ठिकाणी पडून १४ वर्षीय शाळकरी मुलगा अत्यंत गंभीर जखमी झाला आहे.

Pune News : तळजाई वसाहतीतील बायोगॅस प्रकल्पाजवळ पुणे महानगरपालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या टाकीच्या बांधकामाच्या ठिकाणी पडून १४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. या दुर्घटनेत मुलाच्या दोन्ही पायांना गुडघ्याखाली फ्रॅक्चर झाले असून, कंबर, पोट आणि हातालाही दुखापत झाली आहे. (Pune News)
कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याप्रकरणी एल अँड टी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर मनोहर मेहेटा आणि संबंधित कंत्राटदाराविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News)
निखिल नितीन साठे (वय १४) असे जखमी मुलाचे नाव आहे. तो आठवीच्या वर्गात शिकतो. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तो शाळेतून घरी आला. त्यानंतर काही वेळाने मित्र ओम सचिन कसबे याच्यासोबत खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ओमने घरी येऊन निखिल टाकीत पडल्याचे कुटुंबीयांना सांगितले. (Pune News)
ही माहिती मिळताच निखिलची आई मंजू साठे, आजी आणि काका घटनास्थळी धावले. तळजाई येथील बायोगॅस प्रकल्पाजवळ सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीच्या कामाच्या ठिकाणी निखिल पडलेला दिसला. स्थानिक रहिवासी उद्धव लहु कांबळे यांनी अग्निशमन दलाला फोन केला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी निखिलला टाकीतून बाहेर काढले. त्यानंतर त्याला उपचारासाठी भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Pune News)
सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष
काम सुरू असलेल्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी संरक्षक जाळी, चेतावणी फलक किंवा अन्य आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या, असा आरोप निखिलच्या आईने तक्रारीत केला आहे. (Pune News)
या प्रकरणी २१ ऑक्टोबर रोजी कुटुंबीयांनी महापालिकेच्या शिवाजीनगर येथील पाणीपुरवठा विभागात जाऊन चौकशी केली. त्यावेळी संबंधित टाकीचे काम एल अँड टी कंपनीला देण्यात आल्याची माहिती मिळाल्याचे तक्रारीत नमूद आहे. (Pune News)
कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था न केल्यामुळे निष्काळजीपणा झाला आणि त्यातून मुलाच्या जीविताला धोका निर्माण झाला, असा आरोप करत मंजू साठे यांनी प्रोजेक्ट मॅनेजर मनोहर मेहेटा आणि संबंधित कंत्राटदाराविरुद्ध तक्रार दिली. (Pune News)
त्यानुसार सहकारनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५ (ब) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक महेश मोरे करीत आहेत. (Pune News)
Pune News : सिंहगड रोडवर दोघांकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त; रेकॉर्डवरील आरोपींना अटक





