महाराष्ट्रात पुण्यासह 14 रेड झोन
Updated On:

नवी दिल्ली – गृहमंत्रालयाने जारी केलेल्या नव्या यादीनुसार महाराष्ट्रात पुण्यासह 14 रेड झोन जाहीर केले आहेत. या यादीत पुण्यासह मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव, मुंबई उपनगरांचा समावेश आहे.
ऑरेंज झोनमध्ये रायगड, अमदनगर, अमरावती, बुलढाणा, नंदुरबार,कोल्हापूर, हिंगोली,रत्नागिरी, जालना,नांदेड,चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, बुलढाणा, बीड, या जिल्ह्यांचा समावेश आहे. ग्रीन झोन मध्ये उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे.
रेड झोन’मध्ये लॉक डाऊन पूर्वीप्रमाणेच कडक राहण्याची शक्यता आहे. तर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही व्यवहार सुरू करता येणार आहेत.





