ठाण्यात धावणार 123 ई-बस

मुंबई : प्रदूषण कमी करण्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या इलेक्ट्रिक बसेसची मागणी वाढते आहे. पुण्यात सध्या जवळपास 400 ई-बसेस धावत आहेत. आता ठाणे पालिकेनेदेखील ई-बस प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला. यासाठी 123 ई-बसेस ओलेक्ट्रा ही कंपनी पुरवणार आहे.
मुंबईतदेखील 2017 पासून साध्या आणि वातानुकूलित ई-बसेस धावत आहेत. तर, नवी मुंबई मनपा हद्दीतही ई-बस सेवा सुरू आहे. या बसेसना प्रवाशांचा प्रतिसादही चांगला आहे. दरम्यान, ठाणे येथे पहिल्या टप्प्यात 12 मीटरच्या मोठ्या, तसेच 9 मीटरच्या मिडी अशा दोन बसेसची मागणी पालिकेने ऑलेक्ट्राकडे नोंदवली आहे.
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक आणि इवे ट्रान्स. या अनुक्रमे उत्पादक आणि परिचालन करणाऱ्या कंपन्यांमार्फत बसेस चालवल्या जाणार आहेत. या 123 पैकी काही बसेस साध्या, तर काही वातानुकूलित असतील. 9 महिन्यांच्या कालावधीत या बसेसचे वितरण होईल.
हा करार 15 वर्षांसाठी करण्यात येणार आहे. या निविदेची अंदाजे किंमत 185 कोटी रुपये एवढी असेल. या बसेसमध्ये एअर सस्पेंशन, सीसीटीव्ही, आपत्कालीन बटन, मोबाइल चार्जिंगसाठी यूएसबी सॉकेट्स अशा सुविधा असणार आहेत.





