पुणे जिल्हा | नीरेतून 11 टीएमसी पाणी समुद्रात

नीरा. {राहुल शिंदे} – नीरा नदीच्या खोर्यामध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडतो आहे. यामुळे नीरा नदीतील वीर धरण हे तुडुंब भरल असून या धरणांमधून नीरा नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यात येत आहे.
नीरा नदी पात्रात आतापर्यंत सुमारे 11 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नऊ टीएमसी साठवण क्षमता असलेले आणखी एक धरण आपण या पाण्याने भरू शकलो असतो. इतकं पाणी हे नीरा नदीमधून समुद्राकडे वाहून गेले आहे.
दुष्काळावर मात करण्यासाठी शासन आणि नागरिकांकडून पावसाचा थेंब अन् थेंब अडवण्याचा प्रयत्न केला जातो. नीरा नदीच्या खोर्यामध्ये आतापर्यंत चार वेगवेगळी धरणे बांधून झाली आहेत.
या चारही धरणात मिळून 49.199 टीएमसी पाणीसाठा अडून ठेवण्याची क्षमता आहे. मात्र तरी देखील अद्याप नीरा नदीमधून पाणी हे समुद्राकडे जात आहे. मागील दोन वर्षे नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पुरेसा पाऊस झाला नव्हता.
त्यामुळे नीरा नदीला वीर धरणामधून पाणी सोडण्यात आले नव्हते. मात्र यावर्षी अगदी कमी कालावधीत म्हणजेच केवळ 15 दिवसांच्या कालावधीमध्ये वीर धरणामधून नीरा नदी पात्रामध्ये 10 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. नीरा नदीकाठच्या लोकांना या पाण्याचा फायदा होत असतो.
मात्र यातील काही पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळत असते. हे पाणी अडवता आले तर आणखी शेती बागायत होऊ शकते. त्याचबरोबर पाणीटंचाईवर ही मात होऊ शकते. मात्र सध्यातरी यावर कोणताही उपाय दिसत नाही. मात्र उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकणार्या शेतकर्याला डोळ्यासमोर एवढं पाणी समुद्राला जाऊन मिळत असताना मोठी हुरहूर लागून राहते.
वीरमधून 33709 क्युसेकने विसर्ग सुरूच
नीरा खो-यातील चारही धरणांत मिळून 49.199 टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता आहे. आज बुधवारी सायंकाळपर्यंत या तीनही धरणात मिळून 44.183 पीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर गेल्या वर्षी आजच्या दिवशी या चारही धरणात मिळून 36.158 पीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी या चारही धरणात मिळून 8 टीएमसी पाणीसाठा जास्त झाला आहे. तर वीर धरणांमधून सध्या 33709 क्युसेकने पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
नीरा धरण साखळीतील पाणीसाठा
बुधवार (दि. 31)*** गेल्या वर्षीचा पाणीसाठा***एकूण क्षमता (टीएमसी)
भाटघर***22.084***16.375***23.752
नीरा देवघर***10.491***10.242***11.915
वीर***8.768***7.855*** 9.835
गुंजवणी***2.940*** 2.556***3.697
धरण***मंगळवार (दि. 30)***आतापर्यंतचा पाऊस (मिमी)** टक्केवारी
भाटघर***19***671*** 93.97
नीरादेवघर***63***1408*** 89.44
वीर***1***261*** 92.14
गुंजवणी***70***1702
आमचे गाव अगदी नीरा नदी काठावर वसलेले आहे. मात्र आमच्या गावच्या उत्तरेचा मोठा भाग हा सिंचनापासून वंचित राहिला आहे. एवढे पाणी वाहून जात, हेच पाणी अडवले तर आमच्या पिंपरे खुर्द गावचा मोठा परिसर ओलिताखाली येऊ शकतो.
एक वेळ पाणीटंचाईचा सामना करणार्या आम्हा लोकांना आमच्या डोळ्यासमोरून पाणी वाहून समुद्राला जात असताना पाहताना खूप वेदना होतात. – राजेंद्र गायकवाड, सरपंच पिंपरे,खुर्द





