पुण्यातून 11 ‘टेक ऑफ’

पुणे – राज्याने विमानसेवेला हिरवा कंदील दिल्याने, सोमवारपासून विमान वाहतूक सुरू झाली. दोन महिन्यांच्या “ब्रेक’नंतर विमानांचे “ऑपरेशन’ सुरू झाले. सोमवारी सकाळी 7 वाजून 25 मिनिटांनी पुण्याहून पहिल्या विमानाने “टेक ऑफ’ केले. तर दिल्लीहून निघालेले पहिले विमान पुण्यात “लॅन्ड’ झाले.
सोमवारी स्पाइसजेट कंपनीचे विमान सकाळी 7.25 वाजता दिल्लीकडे रवाना झाले. तर दिवसभरामध्ये पुणे विमानतळाहून दिल्ली, चेन्नई, कोची, चंदिगढ, बंगळुरू, अहमदाबाद, जयपूर आणि हैदराबादासाठी 17 विमानांचे “टेक ऑफ’ झाले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत पुण्याहून 8 विमानांचे उड्डाण झाले. यामधून 985 नागरिकांनी प्रवास केला. तर पुण्यात 9 विमाने दाखल झाली. यामध्ये एकूण 672 प्रवासी होते, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.
या सूचनांचे पालन आवश्यक
– मास्कचा वापर करणे बंधनकारक
– आरोग्यसेतू या ऍपवर “सेफ’ असणे आवश्यक
– चेक-इनपूर्वी 2 तास विमानतळावर पोहोचावे.





